९८२३६००७२५ | dbaslibrary@gmail.com

संकल्पना

वाचनालयाची संकल्पना गोविंद गुणाजी धुळे यांचा विचारातून अस्तित्वात आली आहे .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला (शासनमान्य रजि. ई. ३०९) ३१/३/१९८२ ला कायदेशीर मान्यता मिळाली. गोविंद गुणाजी धुळे हे एरिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरीवर कार्यरत असतांना, त्यांनी इ. स. १९८१ मध्ये उत्तमनगरमध्ये काशीनाथ कोंडिराम जाधव आणि पं. नारायणराव पंडित ह्यांच्याशी धुळे साहेबांनी संपर्क साधून त्यांच्या मनातील वाचनालायची इच्छा प्रगट केली. क्षणाचाही विचार न करता जाधव साहेब व पंडित साहेबांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन वाचनालयाची कल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात आणली.

वाचनालयाची इमारत कशी उभारली ?

काशिनाथ कोंडिराम जाधव हे सद्यस्थितीतील वाचनालयाचे अध्यक्ष, संस्थापक मंडळाचे सदस्य आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. १९९२ ते २०१५ या काळात ग्रंथालयाची बिल्डींग तयार झाली आहे. अध्यक्ष काशिनाथ कोंडिराम जाधव यांनी तन मन धनाने अथक परिश्रम घेऊन ही बिल्डींग तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलला.


फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते. याउलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीचीही भूक भागवावी. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसर्याचा गुलाम होतो.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कार्यकारी मंडळ
Copyright © 2016 - All Rights Reserved / Privacy Policy / Terms and Conditions

Website Design and Managed By: Ushainfosoft